पुण्यात पोलिसालाच दमदाटी: मी गुंठा मंत्री आहे, तुमची नोकरी घालवील

पुणे – सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल लक्ष्मण भरम (48, रा.कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्टेबल कौस्तुभ निढाळकर यांनी फिर्याद दिली आहे. निढाळकर हे कोथरुड पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असताना आरोपी राहुल व त्याच्या सोबत वाद झालेला आणखी एक व्यक्ती तेथे आले. दोघेही तेथे येऊन एकमेकांविरुध्द तक्रार घ्यावी म्हणून भांडत होते. तक्रार देण्याच्या वादातून एका गुंठा मंत्र्याने कोथरुड पोलीस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबलच्या नाकाला धडक मारली. यानंतर त्याला धक्का बुक्की करत दमदाटी केली. याप्रकरणी यावेळी दोघांनाही निढाळकर यांनी शांत रहाण्यास सांगून एकमेकाविरुध्द तक्रारी द्या असे सांगितले. यानंतर राहुलशी भांडण झालेल्या व्यक्तीचे ते प्रथम तक्रार नोंदवून घेउ लागले. यावेळी राहुलने तुम्ही मला साईडला घेऊन त्याची तक्रार का पहिली घेताय असा जाब विचारला. तसेच मी कोण आहे तुम्हाला नाही माहिती, मी गुंठा मंत्री आहे, तुमची नोकरी घालवील असे बोलून शिवीगाळ करुन थेट त्यांच्या नाकावर धडक देऊन धक्का बुक्की करत जखमी केले. यानंतर मी अगोदर तीन चार पोलिसांना मारले

Latest News