आम्ही मराठी आहोत, आणि दोन्ही राजे हे आमचे आराध्यदैवत…

balasaheb-thorat_PTI660

मुंबई | औरंगाबादच्या नामंतराच्या मुद्यावरून काँग्रेसवर शिवसेना आणि भाजपने विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर थोरतांनी आपली प्रतिक्रया देत नामंतराला का विरोध करत आहोत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही. कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू, असं म्हणत थोरातांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. दरम्यान, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागत आहे. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे औरंगाबादचं नामांतर केल्यानं मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध करत असल्याची टीका शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर टीका केली होती. यावर काँग्रेस बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला… 

Latest News