आमचा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही- गिरीश बापट


पुणे : गेल्या महापालिका निवडणुकीत ुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.मात्र या चर्चेचा भाजप खासदार गिरीश बापट यांनी इन्कार केला आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला. इतकंच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही या चर्चेचं खंडण केलं आहे ुळीक म्हणाले, “नगरसेवक भाजपमध्ये नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. आमचा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही. कुणीतरी मुद्दामहून ही बातमी पेरली आहे.