सचिन वाझे यांना तत्काळ अटक करा:किरीट सोमय्या


मुंबई : सचीन वाझे यांचे शिवसेनेच्या एका नेत्याशी आर्थिक व्यवहार आहेत. या नेत्याचे नाव काही दिवसांत समोर येणार आहे,” असे सोमय्या म्हणाले.तसेच यावेळी बोलताना सोमय्या यांनी वाझे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. “सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळाला आहे. तरी वाझे यांना अटक केली जात नाही. सचिन वाझे हे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते असून उद्धव ठाकरे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले यांच्याबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीसुद्धा वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “सचिन वाझे यांचे शिवसेनेच्या एका नेत्यासोबत आर्थिक व्यवहार झालेले आहेत. लवकरच काही दिवसांनी शिवसेनेच्या त्या नेत्याचे नाव समोर येणार आहे,” असा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केलाय. सोबतच वाझेंसोबत आर्थिक व्यवहार झालेला शिवसेनेचा तो नेता कोण?, याबबत सोमय्या यांनी मौन बाळगले आहे. सोमय्या यांच्या या आरोपामुळे आता अनेक तर्क लावले जात आहेत.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गायी या दोन्ही मुद्द्यांना घेऊन सोमय्या यांनी सडकून टीका केली. या दोन्ही प्रकरणांचा तपास दोन वेगवेगळ्या संस्थांकडे का असा सवाल त्यांनी केलाय. “मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे आणि स्कॉर्पियो धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे का आहे?, या एकाच प्रकरणावर दोन वेगळा तपास का?,” असा सवाल सोमय्या यांनी केलाय. दरम्यान, उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सोमय्या यांनी हिरेन यांच्या कुटुंबीयांची आज (13 मार्च) भेट घेतली. तसेच सचिन वाझे यांचे शिवसेनेच्या एका नेत्याशी आर्थिक व्यवहार असल्याचा गंभीर आरोप केला.