तातडीची गरज म्हणून आणखी तीन जम्बो कोविड रुग्णालय सुरु करा…..सचिन साठे

तातडीची गरज म्हणून आणखी तीन जम्बो कोविड रुग्णालय सुरु करा…..सचिन साठे
पिंपरी (दि. 20 एप्रिल 2021) कोरोना कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पिंपरी चिंचवड शहरात वीस हजारांहून जास्त रुग्ण ‘होम क्वॉरंटाईन’ आहेत. या रुग्णांमुळे अनेक कुटूंबातील इतर सदस्य देखिल बाधित होत आहेत. मनपाच्या कोणत्याही रुग्णालयात आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्रात साधारण बेड देखिल उपलब्ध नाहीत. अनेक ज्येष्ठ रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजन किंवा व्हेंन्टीलेटरची सुविधा मिळाली नाही यामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्ण मृत्यूचे प्रमाण देखिल मागील दहा दिवसात वाढते आहे. हि चिंताजनक परिस्थिती विचारात घेऊन तातडीची गरज म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात सांगवी येथे एक आणि भोसरी सर्व्हे नं. 1 गावजत्रा मैदान येथे एक तसेच प्राधिकरण निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान येथे एक असे तीन जम्बो कोविड रुग्णालय सुरु करावेत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.