पिंपरी (दि. 20 एप्रिल 2021) पिंपरी चिंचवड मनपाच्या आरोग्य विभागाच्या मागणीनुसार आवश्यक असणारे 50 फॉगिंग मशिन खरेदि करण्यात येणार आहेत. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत लघुतम पुरवठाधारक असलेल्या मे. ए. एस. इंजिनिअर्स, पुणे यांच्याकडून प्रती मशिन रु. 41,600/- याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण पन्नास फॉगिंग मशिनसाठी 21,92,400 = 00 रुपये अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे करारनामा करण्यात आला आहे. या मशिनसाठी एक वर्षांची वॉरंटी असून पुढील तीन वर्षाकरीता तीन टक्के वार्षिक दराने वार्षिक देखभाल दुरुस्ती करणेकामी आणि 50 फॉगिंग मशिन खरेदिसाठी असे एकूण 20,80,000/- (रुपये वीस लाख एैशी हजार फक्तं) इतका खर्च होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.