‘रेमडेसिविर,हिंगोलीचे आमदार संतोष बांगर कडून 90 लाखाची मदत


हिंगोली | रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना बरीच ओढाताण करावी लागत आहे. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. ही गरज लक्षात घेऊन शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले आहेत.सध्याचा कोरोनाचा काळ हा अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढं करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, सुरुवातीला 900 रुपये दराने जवळपास पाचशे रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून संतोष बांगर यांनी मोफत वाटले होते.
नंतर त्यांच्याकडे इंजेक्शन्स मिळतात म्हणून त्यांना अनेकांचे फोन येऊ लागले. मात्र बाजारपेठेत व इतर जिल्ह्यांतही इंजेक्शन्स मिळत नसल्याने अडचणी वाढल्या. अशातच जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपला. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत न मिळाल्यास व्याजाचा भुर्दंड कुणी सोसायचा म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हता. हे कळताच बांगर यांनी स्वत: फिक्स डिपॉझिटमधील 90 लाखांची रक्कम खासगी वितरकाला उपलब्ध करून दिली.