कचरा डेपोला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून सुचना


महापालीकेच्या कचरा डेपोला लागलेली आग विझवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून सुचना
आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही निर्देश
: २ मे :लातूर शहर महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी तत्काळ संबंधितांना संपर्क साधून आग विझवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या, ही आग कशी लागली याची चौकशी करून नंतर अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
अँकर रविवार दि. २ मे (लातूर प्रतिनिधी संतोष टाक)रोजी सायंकाळी वरवंटी नजीक असलेल्या लातूर महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागली होती. त्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी यांची माहिती व्हॉट्सअप वरून थेट पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांना दिली, या माहितीची तातडीने दखल घेत पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, महापालिका आयुक्त अमन मित्तल तसेच लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्याशी संपर्क साधला. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश दिले. घटनास्थळी ताबडतोब पोहोचून या दुर्घटनेत कोणालाही इजा पोहोचू नये याची याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या. आगीच्या या घटनेची नंतर सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.