भाजपविरोधात रणशिंग: ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन…

mamta-ll

कोलकाता :बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर कोरोनाशी लढाई ही आपली प्राथमिकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विजयानंतर उद्धव ठाकरे, नवीन पटनायक, रजनीकांत, अखिलेश यादव अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनंदनासाठी फोन केले. मात्र, पंतप्रधान मोदींनी अद्याप फोन केला नसल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर विविध भागात हिंसाचाराच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशावेळीकोरोनाचा प्रादुर्भाव शमल्यानंतर आम्ही सर्व मिळून काम करु. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोकांच्या मुद्द्यांवर मिळून काम करु इच्छित आहोत. पण एका हाताने टाळी कधी वाजत नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं आहे. तसंच हे वक्तव्य करुन त्यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहेमी आमदारांची बैठक बोलावली आहे. कोरोना विरोधात कठोरपणे लढावं लागेल. ती आमची प्राथमिकता असेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर गंभीर आरोपही केलाय. नंदीग्राममध्ये मोठी गडबड करण्यात आली होती. रिटर्निंग ऑफिसरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नंदीग्राममधील निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Latest News