तीन जिल्ह्यात 5 मे पासून दहा दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन

PicsArt_05-04-09.03.50

कोल्हापूर ::: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरानाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी तीन जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन दिवासात 2500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळं सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा प्रशासनाकडून संध्याकाळपर्यंत लॉकडाऊनसंदर्भातील  गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. तर कोरोनापासून वाचण्यासाठी गाईडलाईन्सचं पालन करुन जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावं, असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. सध्या जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे उद्या बुधवार 5 मे सकाळी 11 पासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार 15 मे पर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली

. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे

.  5 मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Latest News