सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्या 13 जणांविरूद्ध सायबर विभाागाने गुन्हा दाखल


आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्या 13 जणांविरूद्ध सायबर विभाागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याला 8 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी पक्षातील नेत्याचे फोटो मॉर्फ करूनस्वरूप प्रल्हाद भोसले (वय 35, राजेगाव, दौंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नाना पंडित, वैभव पाटील, महेश गुरडले, धनंजय जोशी, जयसिंग मोहन, राजेंद्र पवार, सोनाली राणे, संदीप पाटील, अतुल आयचीत, मुकेश जाधव, शौर्यान चोरगे, राज पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24,रा. कोथरूड ) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय लौकीकास बाधा आणण्याच्या प्रयत्न करत त्यांचे फोटो मॉर्फिंग केले. त्यानंतर सोशल मिडीयावर प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी स्वरूप भोसले याने हिंदू देवदेवता यांच्याबाबत विटंबना करणारी अश्लील चित्रे, व्हिडीओ प्रसरित केले. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.