गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी एकास अटक अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

PicsArt_05-09-01.28.18

तळेगाव | बेकायदेशीरपणे 842 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला ताब्यात घेऊन 842 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम 2900 रुपये जप्त करण्यात आली आहे.बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगणा-यास अटक करण्यात आली समाधान चव्हाण (वय 35, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीसी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्याजवळून 842 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम 2900 रुपये जप्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.07) नवलाख उंब्रे येथे ही कारवाई केली.

Latest News