पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेमडेसिविर’ चा काळा बाजार पुन्हा एकदा उघड

पिंपरी: काळ्या बाजारात एका रेमडेसिविरसाठी ४० हजार रुपयांपर्यंत भाव असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास काळेवाडी फाट्यावर नाकाबंदीच्या ठिकाणी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी संशयावरून हटकले. तपासणी केली असता, त्यांच्याकडे काही रेमडेसिविर आढळून आले.
कृष्णा रामराव पाटील (वय – २२, रा. थेरगाव), निखिल केशव नेहरकर (वय – १९, रा. बिजलीनगर, चिंचवड), शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय-३४, रा. दत्त कॉलनी, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. तीनही आरोपी वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित आहेत.र् पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रेमडेसिविर’चा काळा बाजार पुन्हा एकदा उघड झाला आहे. बेकायदेशीरपणे २१ रेमडेसिविर इंजेक्शन बाळगणाऱ्या तीन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास केल्यानंतर तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वाहनातील सीटखाली उर्वरित रेमडेसिविर आढळून आले. याप्रकरणी अन्न व औषध विभागाने दिलेल्या फिर्यादीनंतर वाकड पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.