पुणे शहरातील ऍक्टीव्ह कोरोना रूगणाच्या संख्येत घट – महापौर मुरलीधर मोहोळ

PicsArt_05-10-07.38.56-1

पुणे -पुणे शहराचा आकडा गेल्या २० दिवसांमध्ये घटत असल्याची वस्तुस्थिती महापौरांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनिशी मांडली. तरीही देशातल्या अन्य शहरांशी तुलना करता पुण्याचा ऍक्टीव्ह कोरोना केसचा आकडा मोठाच आहे. ५ ते ९ मे दरम्यान तो ६४४३५ एवढा राहिला आहे. त्याच कालावधीत नागपूरचा आकडा ३१,४१७ तर नाशिकचा आकडा २५०६७ एवढा आहे. मुंबई वगळून बाकीच्या शहरांचे आकडे यापेक्षा कमी आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीचा हवाला महापौरांनी दिला आहे. अर्थात कोरोनाचे आकडे जरी घटत असले, तरी पुणे शहर आणि जिल्ह्यामधील कडक निर्बंध सध्या कायम राहतील.त्यांचे पुढचे स्वरूप कसे ठेवायचे या विषयी पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले

.

महाराष्ट्रात कोरोना केसेसचा आकडा सातत्याने घटल असल्याची सकारात्मक बातमी आली असतानाच पुण्याबाबतही आकडेवारीची सकारात्मक बातमी आली आहे. गेल्या २० दिवसांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील ऍक्टीव्ह कोरोना केसेसच्या संख्येत घट झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Latest News