पुण्यात महिलेने दिराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या

crime-11

पुणे ( प्रतिनिधी ) पत्नी देविकाने आपला दीर किरण शंकर रांजाळे याच्या मदतीने आपल्या पतीची दगडाने ठेचून हत्या केली. पुणे जिल्ह्यामधील भोर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या दिराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केली आहे. त्या महिलेने दिराच्या मदतीने पतीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी दिराला व त्या महिलेला अटक केली आहे.

अटक केलेल्या दिर भावजय यांची नावे देविका ऊर्फ भारती अमोल रांजाळे आणि किरण शंकर रांजाळे अशी आहेत. तर हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अमोल शंकर रांजाळे असे आहे. पुण्यातील जांभूळवाडी या ठिकाणी राहणारा किरण रांजाळे हा आठ – दहा दिवसांपूर्वी आपली भावजय देविकाला घेऊन भोर तालुक्यातील धानवली या ठिकाणी आपल्या बहिणेकडे आला होता. यानंतर देविकाचा पती अमोलदेखील त्या ठिकाणी आला.यानंतर तिघेजण बहिणीच्या घरून आपल्या घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचा वाटेमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला.

या खुनामागचे कारण अजून समजू शकले नाही.हत्या केल्यानंतर त्या दोघांनी तो मृतदेह धानवलीच्या सोनजाई मंदिराजवळ टाकला. यानंतर गावकऱ्यांना हा मृतदेह आढळला आणि गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी दीर-भावजय यांना अटक केली भोर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे. आहे.

Latest News