पुण्यात गुन्हेगाराने स्वत:वर चाकूने व ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न,

पुणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीचा पोलीस शोध घेत होते. यावरुन एका संशयीत आरोपीचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांना त्याच्या ठाव ठिकाण्याची माहिती मिळाताच त्याच्या घराजवळ सापळा रचण्यात आला. मात्र तो पोलिसांना चकवा देत त्याच्या दुचाकीवरुन पळून जाऊ लागला.पोलिसांनी पाठलाग करताच संशयीत गुन्हेगाराने स्वत:वर चाकूने व ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे उरळी देवाची येथे घडली.पोलीस पथक त्याचा पाठलाग करत असताना त्याची दुचाकी स्लीप झाली.