डॉ.लक्ष्मण गोफणेंचा पदभार ताबडतोब काढा :राजु बनसोडे यांची मागणी

IMG-20210517-WA0134

*डॉ.लक्ष्मण गोफणेंचा पदभार ताबडतोब काढा* राष्ट्रवादीचे नगरसेवक राजु बनसोडे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड ( १७ मे)महानगरपालिकाचे सहा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांना चुकीच्या पध्दतीने पदोन्नती दििली आहे.त्यामुळे त्याांचा पदभार ताबडतोब काढून घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजु बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे

. डॉ.लक्ष्मण गोफणे यांच्या पुढे अनुभवाची अटींची पुर्तता करणारे व अहर्ता असणारे वैद्यकीय अधिकारी असताना त्यांना डावलून डॉ .गोफणे यांना चुकीच्या पध्दतीने पदोन्नती देवून त्यांना सहा.आरोग्य अधिकारी पदाचा पदभार दिला गेला आहे. सहा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी DPH केल्यानंतर ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे

.मात्र गोफणें यांना फक्त ३ वर्षाचा अनुभव आहे. तर गोफणेंची आस्थापना आरोग्य विभागात असताना त्यांना चुकीच्या पध्दतीने वैद्यकीय विभाग प्रमुखाची जिम्मेदारी दिली गेली आहे.काही पदाधिका-यांच्या हा ला हा म्हणतात म्हणूनच त्या पदाधिका-यांच्या स्वार्थासाठी पदभार दिला गेलेला आहे .

ही पदोन्नती व पदभार ताबडतोब काढून घेण्यात यावा व त्या ठिकाणी त्या पदाची अर्हता व अनुभव असणाऱ्या वैद्यकीय विभागातील लायक डॉक्टरांना हा पदभार देण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी निवेदनात केली आहे.

Latest News