जीवे मारण्याची धमकी प्रकरणीमंगलदास बांदल व वर गुन्हा दाखल

पुणे :राष्ट्रवादीने हाकललेल्या मंगलदास बांदल यांनी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला जमीन बळकावण्यासाठी त्रास देत आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावावर गुनहा दाखल करण्यात आला आहे.सणसवाडी परिसरात सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव तनपुरे यांची 2 एकर शेतजमीन आहे. मात्र या जमिनीच्या भोवताली असलेले सुरक्षेचे कंपाउंड तोडून या ठिकाणी असलेल्या विहिरीतून बांदल आणि त्याच्या भावाकडून रोज जबरदस्तीने सहा टँकर पाण्याची चोरी केली जात असल्याचं तक्रारदार ज्ञानदेव तनपुरे यांनी दिली

.

याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे.बांदल व त्यांच्या भावाकडून संबंधित शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं तनपुरेंनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे

.पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील एका नामांकित सराफ व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवित व जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी मंगलदास बांदल केली होती. यामुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांची हाकलपट्टी केली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरु असल्याबाबतच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी 14 मार्च 2020 रोजी केली होती.

Latest News