यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर …

तळेगाव दाभाडे, वार्ताहर :(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)-

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची तळेगाव शाखा आपला २० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यनिमित्त येत्या २४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रसाद खांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, संचालक सुरेश दाभाडे, राजेश बारणे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.वर्धापन दिन समारंभ २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता सेवाधाम ग्रंथालया शेजारी नाना भालेराव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे संपन्न होणार असून, या समारंभाला प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत.तळेगावातील सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात अजोड कामगिरी करणारे प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्काराने, तर नापासांची शाळा या उपक्रमा‌द्वारे तब्बल तीन हजार नापास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देणाऱ्या नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या समारंभासाठी प्रगतशील शेतकरी व उद्योजक सुनील जाधव, नंदकुमार वाळुंज, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य अभिनेते राजन भिसे, अभिनेत्री नेहा महाजन हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्याभिनय व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजनअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने तळेगाव व मावळ परिसरातील ८ ते १४ वयोगटातील शालेय वि‌द्यार्थ्यांसाठी २८ एप्रिल ते ७ मे या कालावधीत नाट्याभिनय व व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नृत्य, नाट्य, संगीत, हस्तकला या विषयातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या शिबिरात कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध नाट्य प्रशिक्षक संजय हळदीकर मार्गदर्शन करणार आहेत, तर अ.भा.म.नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या संचालक नयनाताई डोळस या शिबिराच्या प्रकल्प प्रमुख आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनयंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर

Latest News