पिंपरी चिंचवडच्या महापौर पदी भाजपचे ”रवी लांडगे” यांची बिनविरोध निवड

ravi lange

पिंपरी चिंचवडच्या महापौर पदी भाजपचे रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज भाजपा कडून रवी लांडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याच्या विरोधात कुणीही फार्म भरला नसल्याने त्याची निवड ही बिनविरोध निवड झाली आहे

सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक निवडून आलेल्या लांडगे आले आहेत. मात्र, या निवडीमुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची संधी हुकल्याची चर्चा आहे.विधानसभेच्या वेळी काटे यांनी आमदार शंकर जगताप यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढत, जगतापांनीच लांडगे यांच्या नावाला पाठबळ दिल्याचे बोलले जात आहे.

मध्ये काही काळ ठाकरे सेनेत जाऊन पुन्हा भाजपमध्ये परतलेल्या लांडगे यांच्या गळ्यात अखेर महापौर पदाची माळ पडली आहे.२०१७ मध्येही लांडगे यांनीच भाजपचे पहिले खाते उघडले होते

पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी लांडगे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे, वाढत्या वाहतूक कोंडीवर शाश्वत उपाययोजना राबवणे, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांना गती देणे. महापालिकेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करणे” या मुद्द्यांवर भर दिला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपले पहिले खाते उघडले असून प्रभाग क्रमांक ६ ‘ब’ मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौर पदी भाजपचे शर्मिला बाबर यांनी अर्ज भरला आहे

,

Latest News