शहरातील सर्व हॉस्पिटलच्या कोरोना काळातील बिलांच ऑडिट करा : नाना काटे

पिंपरी चिंचवड– शहरातील सर्व हॉस्पिटलच्या कोरोना काळातील बिलांची तपासणी महापालिका प्रशासनाकडून करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते, जेष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दि, …………कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्राथमिक लक्षणे, उपचार आणि इन्फ्रास्ट्रक्चर याचा अभ्यास करण्याची जबाबदारी करिता एक समिती गठीत करावी. तसेच, या समितीच्या तज्ज्ञांनी बालरोग डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना काळात अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल प्रशासनाने मनमानी पद्धतीने बिले वसूल केली आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा वाढीव रक्कमेची बिले वसूल केली असल्याच्या अनेक तक्रारी पहावयास मिळाल्या

. तर काही हॉस्पिटलकडे बील न दिल्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांना दिले नाहीत. काही ठिकाणी व्हेंटिलेटर बेड देण्यासाठी आर्थिक तडजोडीही हॉस्पिटलकडून केल्याच्या घटना घडल्या आहे.शहरातील बालरोग्य तज्ज्ञ आणि चाईल्ड केअर हॉस्पिटल मधील सोयी-सुविधा आणि कमतरता याचा अभ्यास करण्यात यावा. लहान मुलांसाठी आरोग्य मार्गदर्शनपर हेल्पलाईनही सुरू करण्यात यावी

. डॉक्टरांच्या सोबत बैठक बोलावून पालिकेकडून सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात.शहरातील कोरोना रुग्णांचा सर्वाधिक मृत्यूदर हा बिर्ला हॉस्पिटलचा असल्याचे दिसून आले आहे. याच हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल केल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना भेटून न देणे, रुग्णांशी फोनवर बोलण्यास बंदी घालणे, रुग्णांची सद्यपरिस्थितीची माहिती लवकर दिली जात नाही. मात्र, पैसे भरायचे असल्यास सातत्याने फोन करणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी.

Latest News