पुण्यातील मीनल भोसले यांनी तयार केलं कोरोना चाचणीचं किट


पुणे | …….पुण्यातील माय लॅब येथे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे भोसले यांनी त्यांच्या गरोदरपणात कोरोना चाचणीचं एक किट बनवलं आहे. या किटच्या निर्मितीनंतर आता कोरोनाची चाचणी घरबसल्या करता येईल. या किटची डिजाईन देखील मीनल आणि त्यांच्या टीमने केलेली आहे
किट तयार करताना मीनल या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. यादरम्यान त्यांनी 10 जणांना सोबत घेऊन या किटच्या निर्मितीचं काम सुरु केलं. पुण्यातील एनआयव्ही या संस्थेत 18 मार्च 2020 रोजी किटची पहिली चाचणी घेण्यात आली होती
. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 19 मार्च रोजी मीनल यांनी मुलीला जन्म दिला. मग पाच दिवसात म्हणजे 23 मार्च 2020 रोजी त्यांनी अन् त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली.गरोदरपणात त्यांना काही अडचण आल्याने मीनल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. डिस्चार्जनंतर त्यांनी लगेच या किटवर काम सुरु केलं. दिवस-रात्र न थांबता या 10 जणांच्या टीमने काम केलं.
.दरम्यान, 18 तारखेला सबमिशन करुन, तासाभरातच मीनल हॉस्पिटलमध्ये सिझेरियनसाठी भरती झाल्या. 19 तारखेला त्यांनी मुलीला जन्म दिला आणि पाच दिवसात त्यांच्या टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता मिळाली. आता आपल्याला कोरोनाची सौम्य लक्षणं अनुभवली तरी घरबसल्या कोरोनाची टेस्ट करता येणार आहे.