पिंपरीत वाढदिवस फेसबूकवर एक पोस्ट आणि थेट पोलीस कोठडीत

पिंपरीत राहणारा अजय काळभोर याचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी या भाईने फेसबूकवर एक पोस्ट टाकली. ज्यामध्ये लिहलं होतं, ‘कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड में अपनाही नाम होगा’. या पोस्टवर त्याच्या सोबतच्या सहकाऱ्यानही कमेंट केली आहे. अजय काळभोर याचा साथीदार असलेल्या प्रशांत सोनावणे याने त्याला शुभेच्छा देत म्हटलं, ‘भाऊ आमचा बाप तुमचा’ पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात गुंडगीरीच्या घटना वाढत आहे. आपली दहशत निर्माण करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतं आहे. अशातच एका भाईला आपली दहशत निर्माण करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यानं वाढदिवसाच्या दिवशी फेसबूकवर अशी एक पोस्ट टाकली की त्यामुळे त्याला थेट कोठडीत जावं लागलं., पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अजय विलास काळभोर, त्याचा साथिदार अनिल प्रशांत सोनावणे आणि काळभोर याचं फेसबूक अकाऊंट सांभाळणारा सोमनाथ देवाडे यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे या ‘भाई’ला आपला वाढदिवस कोठडीतच साजरा करावा लागला. पोलिसांनी गुरुवारी या आरोपींना न्यायलयात हजर केलं त्यावेळी त्यांना जामिनावर सोडून देण्यात आलं.पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. तसेच पोलीस सोशल मीडियावरही नजर ठेवून असतात. पोलिसांना ही फेसबूक पोस्ट दिसली आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यावर कारवाई केली.

Latest News