विलास लांडे व मंगला कदम यांच्या पैशाच्या हव्यासामुळे कार्यकर्त्यांवर होतो अन्याय…

PicsArt_06-02-09.35.43

पिंपरी : माजी आमदार विलास लांडे व माजी महापौर मंगला कदम यांच्या पैशाच्या हव्यासामुळे पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असा खळबळजनक आरोप वृक्ष प्राधिकरण समितीचे नवनियुक्त सदस्य आनंदा यादव यांनी महानगरपालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सुमारे १५ वर्षे काम केले. मात्र, याकाळात पक्षाने एकाही महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली नाही. शेवटी २०१९ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपाचे काम करायला सुरूवात केली. अखेर आमदार लांडगे यांनी मला महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यपदी काम करण्याची जबाबदारी दिली. राष्ट्रवादीने मला कायम डावलले, पण आमदार लांडगे यांनी सावरले आहे, अशा भावनाही वृक्ष प्राधिकरण समितीचे नवनियुक्त सदस्य आनंदा यादव यांनी व्यक्त केल्या.

Latest News