मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल: आ.चंद्रकांत पाटील


पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाज ची हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.
.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधला याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन ते तिथे गेले होते, त्यामुळे ही चांगली बाब आहे. पण केंद्राकडे आणि मोदींकडे आरक्षणाचा काहीच मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. पण, केंद्राने यावर मार्ग काढण्यास प्रयत्न करण्याचे सांगितलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे