सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

images-2021-06-01T213409.235

पुणे : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या 37 व्या (सेट) अर्ज भरण्याची मुदत 10 जून ऐवजी आता 17 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे.

18 जून ते 25 जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना 500 रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून 26 ते 30 जून यादरम्यान दिली आहे. याबाबची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (37 वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, 26 सप्टेंबर, 2021१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. . 

१. खुला रु. 800/- (प्रक्रिया शुल्कासह)

२. इतर मागासवर्गीय/ भटक्या व विमुक्त जाती जमाती/ रू. 650/- (प्रक्रिया शुल्कासह) विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ

विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडीट / डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बैंकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.

जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.

Latest News