पिंपरी-चिंचवड शहरातील 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शिथिलता नाही- महापालिका आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवड | पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) आढावा घेतला. पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता दिली नाही.या बाबत अधिक माहिती देताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “मागील आठवड्यातील पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के तर पिंपरी-चिंचवडचा 5.2 टक्के होता. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी मागील आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्यामुळे शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्यात आली नसल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील आणखी निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना दिल्या. तर,पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने निर्बंध आणखी शिथिल केले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी जुन्या निर्बंधाचे पालन करावे”.दरम्यान, पुणे शहरातील दुकानांची वेळ सायंकाळी सातपर्यंत वाढवण्यात आली. हॉटेल रेस्टॉरंट रात्री दहापर्यंत खुली राहणार आहेत. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये सद्यस्थिती कायम राहणार आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या दरम्यान असल्याने जिल्ह्यात सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल नाही.