पिंपरी चिंचवड विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई


विनामास्क बाहेर फिरणा-यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करीत विनामास्क बाहेर फिरणा-या 89 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पिंपरी चिंचवड हद्दीतील 18 पोलीस चौकीतील पोलिसांनी 89 जणांवर दंडात्मक कारवाई केली. पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, घराबाहेर पडताना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.त्यापैकी भोसरी एमआयडीसी हद्दीत सर्वाधिक 15 जणांवर कारवाई करण्यात आली.पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी ते शुक्रवारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, शनिवारी, रविवारी अत्यावश्यक वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.