पुन्हा एकदा फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊ शकतो- रामदास आठवले

PicsArt_06-12-09.38.53

मुंबई | अजित पवारांविषयी मला आदर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणातही आहेत. आता ते म्हणत आहेत की, ‘कोणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही.’ त्यावर मी असंच म्हणेन की, कोण आहे तो मायचा लाल, मला तर दिसतेय ही अजितदादांची चाल. त्यामुळे एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. अशात आरपीयआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बननण्याची संधी मिळाली. चांगली गोष्ट आहे. एकत्र न येणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कधी पडेल, हे सांगता येत नाही, असंही रामदास आठवले म्हणाले. यावेळी बोलताना आठवलेंनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीबाबतही भाष्य केलं आहे.दरम्यान, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊ शकतो. असा विश्वास मला आहे.

Latest News