बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता भाजपाने ठेवायला हवी…

images-2021-03-22T105244.376

मुंबई :+ राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, असं जे पसरवलं जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून एखाद् दुसरा आमदार गळास लागेल, पण त्यातून बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असं राऊत यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगतात, ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. त्याच वेळी चंद्रकांत पाटील ठामपणे सांगतात, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल. कोणाला कळणार नाही. भाजपचे धोरण स्पष्ट दिसत नाही. सरकारचं काय करायचं ते फडणवीस व पाटील यांनी एकाच टेबलावर बसून काय ते ठरवायला हवं, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

Latest News