राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील युवतींची आढावा बैठक

IMG-20210614-WA0005

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी विधान सभेवर व प्रभाग निहाय नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर म्हणाल्या की, प्रथमतः राष्ट्रवादी अभिप्राय अभियान मधे राज्यात युवती सेल मध्ये वर्षा जगताप व त्यांच्या युवती टीम ने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.काल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशअध्यक्ष कु.सक्षनाताई सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहराची युवतींची आढावा बैठक पार पडली.या मिटिंगमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवती काँग्रेस करत असलेल्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीचा ,कार्यक्रमांचा तसेच

तसेच सुशिक्षीत तसेच तरुणवर्ग राजकारणात सक्रिय होणे ही काळाची गरज आहे युवतींनी तळागाळापर्यंत जाऊन पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे. राज्यात पिंपरी चिंचवड शहराच्या युवतींचे काम अतिशय चांगले असून संघटनात्मक बांधणी देखील अतिशय उत्तम आहे असेही यावेळी त्या म्हणाल्या. शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटिल म्हणाले की, वेळोवेळी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन वेगवेगळे कार्यक्रम घेऊन पक्षाचे सक्रिय कार्य युवती संघटनेच्या माध्यमातून होत असते

. कोरोना काळात देखील गरजू लोकांना धान्य वाटप, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत, सॅनिटाइझर स्टँड वाटप ,घरकाम महिलांसाठी दिवाळी फराळ भेट असे कौतुकास्पद काम युवतींनी केले. तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या युवती अध्यक्षा यावेळी म्हणाल्या की,आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,आदरणीय अजित दादा पवार , खासदार सुप्रियाताई सुळे व युवानेते पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षीत युवतींची प्रभागनिहाय व वाॅर्ड अध्यक्ष अशा निवडी करण्यात आलेल्या आहेत.संघटन मजबूत होण्यासाठी विशेष प्रयत्न व बैठका घेणार आहे.

काही युवतींच्या नियुक्ती खालीलप्रमाणे करण्यात आल्या. नेहा पडवळ (भोसरी विधानसभा युवती आध्यक्ष), लालबी शेख़ लोखंडे( पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष), श्वेता पाटे, मानसी गोफने,राजश्री अहिरे, मनाली कुटे,भव्यशीला गायकवाड, भाग्यश्री खोब्रागडे,अंकिता साळवे यांची प्रभाग अध्यक्ष तर छाया घाडगे ,अमृता घाडगे यांची वाॅर्ड अध्यक्ष पदी निवड करण्यात आली

.
या बैठकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष मा. महापौर संजोगभाऊ वाघेरे पाटिल , ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी भोईर, शिक्षण मंडळाचे मा. सभापती फजलभाई शेख़, सामाजिक न्याय विभाग महिला आध्यक्ष सौ. गंगाताई धेंडे ,जन्नतताई सय्यद, सपनाताई घाडगे, रविराज काळे, गणेश ,विशाल सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केले होते.

Latest News