आंतरजातीय विवाह: तरुणीला कुटुंबांकडून भर रस्त्यात मारहाण

Indian-wedding

.पुणे : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका तरुणीला तिच्या कुटुंबांनी भर रस्त्यात मारहाण करून, तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार धायरी रस्त्यावर रविवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी एका तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, तिची आई, भाऊ, काका, काकाचा मित्र आणि आईच्या दोन मैत्रिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेळी तरुणीची सासू आणि नणंद यांनी तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता, तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांनाही मारहाण केली आहे.सासू आणि नणंदेसोबत संबंधित तरुणी रिक्षातून जात होती. त्या वेळी तरुणीच्या कुटुंबीयांनी रिक्षाच्या समोर चारचाकी आडवी घातली आणि तरुणीला बाहेर ओढून काढून मारहाण केली.

तरुणीची सासू आणि नणंद तिला सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने चारचाकीत बसवून तिच्या हातावर वार केले. त्यानंतर तरुणीने चालत्या गाडीतून दरवाजावर लाथ मारून बाहेर उडी मारली…

Latest News