प्रश्न अधिवेशनात मांडता आले नाहीत तर,रस्त्यावर उतरून मांडू- देवेंद्र फडणवीस


मुंबई :आक्रमकतेने पण तितक्याच संयमाने जनतेचे प्रश्न मांडणार आहोत. सभागृहात हे प्रश्न मांडू दिले गेले नाहीत तर जनतेमध्ये जाऊन, रस्त्यावर उतरून या प्रश्नांना आम्ही वाचा फोडू. मग रस्त्यावर उतरून हे गर्दी करतात असे म्हटले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला
. लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम राज्यातील सरकारने केले असून राज्याच्या विविध खात्यांत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर विरोधी पक्षाने बोलूच नये, अशी रचना अधिवेशनात करण्यात आली आहे, असा आरोप करताना अशी कितीही कोंडी केली तरी जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. प्रश्न अधिवेशनात मांडता आले नाहीत तर जनतेत जाऊन, रस्त्यावर उतरून ते आम्ही मांडू, असा इशारा विरोधी पक्षनेते यांनी आज दिला
सरकारमधील तीन पक्षांमध्ये विसंवाद असल्यानेच विधानसभा अध्यक्षांची निवड लांबली आहे. आताही ती होईल असे वाटत नाही, असे नमूद करताना तुमच्याकडे बहुमत आहे तर मग हे महत्त्वाचे पद रिक्त का ठेवले, असा सवाल फडणवीस यांनी केला.