पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या


पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास असलेल्या व पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. श्रद्धा शिवाजी जायभाय (वय- २८) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.श्रद्धा यांना त्यांची मैत्रीण रात्रीपासून फोन करत होती. मात्र, श्रद्धा प्रतिसाद देत नव्हत्या. मैत्रिणीने पुन्हा सकाळी फोन केला, तेव्हा देखील फोन उचलला नसल्याने त्यांनी तिथे राहात असलेल्या ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती घेतली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा जायभाय या पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत होत्या. त्यांचा विवाह झालेला असून त्यांचे पती हे भारतीय नौदलात कार्यरत आहेत. तर, त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, काल रात्री त्यांनी आपल्या मुलीला नातेवाईकांकडे सोडले. त्यानंतर आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली
.
दरवाजा ठोठावण्यास सांगितला. परंतु, दरवाजाच्या आतून प्रतिसाद मिळत नसल्याने याची माहिती वाकड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.