23 गावांत वाहतूक, बस थांबे, आगारे, कचऱ्याची विल्टेवाट आराखडा पुणे महापालिकेत


पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत वाहतूक सुरु करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएमएलने सुरु केली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करुन लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांपैकी 16 गावांत पीएमपीची वाहतूक सध्या सुरु आहे. मात्र, उर्वरित गावांतील वाहतूक सुरु करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे
.पुणे शहराच्या हद्दीलगतची आल्यानंतर आता या गावांच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्टेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. या गावांमध्ये सुमारे 250 टन कचरा निर्माण होत असून, तो जिरवण्यासाठी महापालिकेला पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभारावे लागणार आहेत. घनकचरा विभागाने समाविष्ट गावातील कचऱ्याचा आढावा घेतला असून त्यासाठी नियोजन सुरु केले आहे
. यासाठी लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.23 गावांपैकी किमान तीन ठिकाणी पीएमपीची आगारे उभारण्याची गरज आहे. बस थांबे, आगारे, पास केंद्र यांच्या जागांसाठी पीएमपीएमएल पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करेल. त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधून पीएमपीएमएलसाठी काही जागांचे आरक्षण निश्चित करण्यास सांगितले जाईल
. ही 23 गावं पालिका हद्दीत आल्याने तिथल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आली आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार होता. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वय करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे.
23 गावे
- खडकवासला
- किरकटवाडी
- कोंढवे धावडे
- मांजरी बुद्रूक
- नांदेड
- न्यू कोपरे
- नऱ्हे
- पिसोळी
- शेवाळवाडी
- काळेवाडी
- वडाची वाडी
- बावधन बुद्रूक
- वाघोली
- मांगडेवाडी
- भिलारेवाडी
- गुजर निंबाळकरवाडी
- जांभूळवाडी
- होळकरवाडी
- औताडे हांडेवाडी
- सणसनगर
- नांदोशी
- सूस
- म्हाळुंगे