वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रेखा ठाकूर


पुणे : वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदावर प्रभारी म्हणून रेखा ठाकूर यांनी नेमणूक करण्यात येत आहे. डॉ अरुण सावंत आणि महाराष्ट्र समिती मदत करतील. या काळात आपण सर्व विजयाच्या दिशेनं वाटचाल करूया, अशी आशा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला नवा बुस्टर मिळणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या.
पक्षाच्या दैनंदिन कामासाठी मी कार्यरत राहणार नाही. माझ्या व्यक्तिगत कामासाठी मी पदावर कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. त्याचबरोबर संघटन चाललं पाहिजे. वंचित बहूजन आघाडीने आंदोलनाला सुरवात केली आहे. येत्या काळात 5 जिल्यात निवडणुका आहे. त्यामुळं पक्षाला अध्यक्ष असणं गरजेचं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले
वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेस सोबत युती करण्याबाबत सुचक वक्तव्य केलं होतं. तर मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेला समर्थन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांसाठी रजेवर जाणार आहेत.