शिवसेनेचे पिंपरी चिंचवडमध्ये 50 नगरसेवक निवडून आणायचे हे पक्षाचं उद्दीष्ट

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा महापौर बनवणे हे शिवसेनेचं ध्येय आहे. शिवसेनेचे पिंपरी चिंचवडमध्ये किमान 50 नगरसेवक निवडून आणायचे हे पक्षाचं उद्दीष्ट आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर  50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर होत नसल्याचं पत्रकारांनी म्हटलं. यानंतर 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा सवाल करत राऊतांनी टोलेबाजी केली

.राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सातत्याने कोणत्या न कोणत्या मुद्यावरुन एकमेकांवर बरसताना दिसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणांची प्रतिष्ठा केंद्र सरकारने धुळीला मिळवली आहे. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन घेणारे नेते जास्त काळ टिकत नाहीत.सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. मात्र, हे सर्व फार काळ चालणार नाही. या यंत्रणांना फक्त विरोधी पक्षातील नेत्यांच्या घराचे पत्ते माहित आहेत, सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे माहित नाहीत.

Latest News