पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

पुणे : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या (PMPML) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे pmpml च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रेही सोपवण्यात आली आहेत.

PMPML च्या अध्यक्षपदी अधिकारी फारकाळ टिकत नाहीत, असा आजवरचा शिरस्ता आहे. गेल्या 14 वर्षात पीएमपीएलएमच्या अध्यक्षपदी 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे तर दुसरीकडे ठाकरे सरकारने कोरोना काळात चांगली कामगिरी करणारे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची बदली केली आहे. त्यांच्याजागी आर. विमला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर. विमला शनिवारी सकाळी रवींद्र ठाकरे यांच्याकडून पदभार स्वीकारतील. IAS रविंद्र ठाकरे यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेले नाही.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत वाहतूक सुरु करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएमएलने सुरु केली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करुन लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांपैकी 16 गावांत पीएमपीची वाहतूक सध्या सुरु आहे. मात्र, उर्वरित गावांतील वाहतूक सुरु करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.


23 गावांपैकी किमान तीन ठिकाणी पीएमपीची आगारे उभारण्याची गरज आहे. बस थांबे, आगारे, पास केंद्र यांच्या जागांसाठी पीएमपीएमएल पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करेल. त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधून पीएमपीएमएलसाठी काही जागांचे आरक्षण निश्चित करण्यास सांगितले जाईल.

Latest News