पिंपरी चिंचवड भाजपाच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे निधन


पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तआधारी भाजपाच्या थेरगाव येथील नगरसेविका अर्चना तानाजी बारणे (वय-३८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती तानाजी, एक मुलगा आणि एक मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवारी (९ जुलै) त्यांनी प्रभागात फेरफटका मारला होता. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत बिघडली म्हणून एका रुग्णालयात उपचार सुरू होते
. नंतर तब्बेत अधिक बिकट झाल्यावर त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचे निधन झाले. नुकताच ६ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा केला. सायंकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.