आमदार निलेश लंकेंना इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा

पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून निलेश लंके यांच्यावर रोष असल्याचं दिसून आलं. यावर बोलतानानिलेश लंके यांनी ज्योती देवरे भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण चर्चेत असताना यावर प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी निलेश लंकेंना पाठींबा दिला आहे.

कुत्री कितीही भुंकली तरी हत्ती थाटात चालतो, असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. निलेश लंकेंच्या शरद पवार आरोग्य मंदिरात त्यांचं कीर्तनाचं आयोजित करण्यात आलं होतंं. त्यावेळी बोलताना महाराजांनी निलेश लंके यांना पाठिंबा दिलाया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निलेश लंके यांची भेट घेतली. या भेटीनंतर अण्णांनी बोलताना, असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यामध्ये नको, जर वेळ पडली तर मी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलेल

Latest News