यंदाही राज्यात दहीहंडीला परवानगी नाही…

कोरोना संकटामुळे मागील वर्षी मुंबईसह राज्यात दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा भव्य नसला, तरी छोट्या प्रमाणात तरी परवानगी द्यावी असा जोर दहीहंडी पथकांनी धरला होता.ठाकरे सरकारने यंदाही मुंबईसह राज्यात दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

दहीहंडी साजरी करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच भाजपकडून घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका घेतली.मुख्यमंत्री यांनी सांगितले की, हा बाल गोपालांचा उत्सव आहे. गेल्यावर्षीपासून जी अनाथ बालके झाली आहेत त्यांची अवस्था काय आहे ते पाहावे. लसीकरणानंतरही काही देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे.

इस्त्राईलमध्ये पुन्हा मास्कची सुरुवात करण्यात आली आहे. अर्थचक्र चालवण्यासाठी परवानगी दिली आहे, कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यामुळे समजूतदारपणे आपण वागलो, नाही तर संकट अटळ आहे.

Latest News