पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधक सक्षम नसल्याने सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी लूटमारीला राष्ट्रवादीची मुक संमती
विरोधक सक्षम नसल्याने
सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी लूटमारीला राष्ट्रवादीची ” साथ “
पिंपरी ( विनय लोंढे ) पिंपरी चिंचवड महापालिकेत रोज नवीन नवीन भाजपची भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत स्थायी समिती मधील लाचखोर प्रकरण, भांडार मधील मास्क, पीपी किट, साबण, परवाना विभागाची बोर्डाची परवानगी, स्थापत्य मधील बोगस बिल,FDR घोटाळा पाणीपुरवठा मधील कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी, प्रशांसनाची बोगस डीपीसी बैठक,मुळे चीफ औडिटर बदली झाली मात्र बोगस डीपीसी बैठक घेणारे प्रशासनातील अधिकाऱ्याची बदली झाली नाही, अभियंता बदली घोटाळा प्रकरण, स्मार्ट सिटी मधील भ्रष्टाचार स्पर्श ची बोगस बिल, बोगस हॉस्पिटल,अशी अनेक प्रकरने बाहेर आली मात्र विरोधक सक्षम नसल्याने महानगरपालिकेची “भ्रष्टाचाऱ्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली
महापालिकेतील सत्ताधारी भाजप च्या भ्रष्टाचारी कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही तितकीच “साथ ” मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थायी समिती मधील लाचखोर कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेस च्या चार सदस्यांची मुख संमती असल्याने हा सगळा भोगळ कारभार पुढे आला त्यातच लिपिक पिंगळे हा मनमानी पद्धतीण टक्केवारी गोळा करत असल्याच पुढे आले आहे
पिंपरी चिंचवड महापालिकेतील महत्वाच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांमध्ये भाजपचे १० सदस्य आहेत तर त्यापाठोपाठ संख्येने क्रमांक दोनचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ सदस्यांचा समावेश आहे.
स्थायी समितीच्या माध्यमातून मागील साडेचार वर्षात घेतलेल्या निर्णयामुळे भाजपचा भ्रष्ट कारभार असल्याच्या बातम्या अनेकदा पहावयास मिळाल्या
. मात्र या भ्रष्ट कारभाराला राष्ट्रवादीचे सदस्य तितकीच साथ देत असून त्याचे अनेक मोठे टेंडर असल्याची माहिती येत आहे त्यामुळे भाजपाच्या दरोडे खोरीला राष्ट्रवादी ची साथ आहे असल्याचे उघड गुपित असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे
मोठे विषय सहज व विरोध न होता मंजूर केले जात असल्याने भाजपच्या भ्रष्ट कारभाराला राष्ट्रवादी पक्षाची तितकीच साथ असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
स्पर्शचे पैसे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बँकेत.. कोरोना काळात एकाही रुग्णास उपचार न करता सव्वापाच कोटी रुपये बिल काढणाऱ्या स्पर्श हॉस्पिटल घोटाळ्याने पिंपरी महापालिकेची प्रतिमा मालिन झाली. या सगळ्या प्रकारणावर आयुक्त राजेश पाटिल यांनी लक्ष देऊन चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्ताकडे केली आहे
राज्यात महाविकास आघाडी सरकारला विरोधीपक्ष भाजप हा अनेक मुद्यावर सळो की पळो करत असताना मात्र पिंपरी महापालिकेत सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहताना पिंपरी महापालिकेतील भाजप राष्ट्रवादीच्या भ्रष्ट युतीची चर्चा राज्यभर होत आहे.