शेवटच्या घटकाचा विकास हीच भाजपची भूमिका; महापालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके यांचे मत

शेवटच्या घटकाचा विकास हीच भाजपची भूमिका; महापालिकेचे पक्षनेते नामदेव ढाके यांचे मत

पिंपरी, दि. 26 – अंत्योदय अर्थात समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे हीच भाजपची भूमिका असून त्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत. त्यात नगरसेवक एकनाथ पवार यांच्या सारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याचे योगदान मोठे आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केले

. माजी सत्तारूढ पक्षनेते, विद्यमान नगरसेवक एकनाथ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णानगर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ढाके बोलत होते.या वेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, क्रीडासमितीचे सभापती उत्तम केंदळे,भाजपाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, उपस्तित होते

नामदेव ढाके म्हणाले की, एकनाथ पवार कामगार चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व आहे. राज्यातील विविध भागातील 50 हजार युवकांना युवाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच पक्ष संघटनासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. गेल्या दहा वर्षात प्रभाग क्रमांक 11 चा विकास झाला नव्हता. तो भाजपच्या सत्ताकाळात झाला. एकनाथ पवार यांच्या दृष्टीतून सिंगापूरच्या धर्तीवर उद्यान विकसित केले जात आहे. त्यामुळे पर्यटनाला याचा फायदा होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळेल. शहराचा नावलौकिक होईल.नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले की, शहरात सद्यःस्थितीत निवडक पर्यटन केंद्रे आहेत

. सिंगापूरच्या धर्तीवर चिखली पूर्णानगर येथे जागतिक दर्जाचे तीन मजली पर्यटन केंद्र नागरिकांसाठी खुले होणार आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. पर्यावरणविषयक जाणिवेच्या अभावामुळे निसर्गातील सर्व घटकांचे प्रदूषण होत आहे. दैनंदिन जीवनातील गरजांची मागणी वाढत असल्यामुळे नैसर्गिक संपत्तीवर ताण येत आहे. ही गरज ओळखून शहरात पर्यटन केंद्र विकसित करण्याचे भाजपने ठरविले आहे

. त्याचाच भाग म्हणून सेक्टर क्रमांक 18 येथे पर्यटन केंद्राचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणारतसेच, नद्यांचे संवर्धन, सुशोभीकरण व जलपर्यटन केंद्राची निर्मिती करण्याचे आश्वासन सत्तारूढ भाजपने पक्षाच्या जाहिरनाम्यात दिले आहे. याशिवाय शहराबाहेरील नागरिक भेट देतील, अशा पद्धतीने जागतिक दर्जाची पर्यटन केंद्र विकसित केली जातील, असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने पूर्णानगरचे पर्यटन केंद्र देशाच्या नकाशावर स्थान मिळवेल, असा दावा एकनाथ पवार यांनी केला

पवार म्हणाले की, तीन मजली पर्यटन केंद्र असणार आहे. पाथ-वे, हिरवळ, खेळणी, तलाव, पक्षी निरीक्षण, चौपाटी, अ‍ॅडव्हेंचर पार्क असून, पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर सुविधा असणार आहेत. भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, पोपट हजारे, ऐश्वर्या पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

Latest News