समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी ॲड. सहदेव वाळके यांची निवड


समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी ॲड. सहदेव वाळके यांची निवड
पिंपरी, दि. 19 – पिंपरी चिंचवड येथील ॲड. सहदेव जानुजीराव वाळके यांची समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी ॲड. सहदेव वाळके यांची निवड झाली आहे. समाजवादी पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अबु आसीम आजमी यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे.
ॲड. सहदेव वाळके हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणीक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत त्यांच्या या निवडीमुळे पिंपरी चिंचवड मधील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.