हडपसर कोयता गँगवर मोक्का लावा- विरोधी पक्ष नेते अजित पवार


पुणे,:( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) पुण्यतील-कोयता गँगचा प्रश्न आता थेट राज्याच्या विधानभवनात उपस्थित झाला आहे. कोयता गँगवर मोक्का लावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आजच्या अधिवेशनात केली होती. याची दखल आता पोलिस प्रशासनाने घेतली आहे.
पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची नियुक्ती झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात अशा प्रकारचा “रूट मार्च” काढण्यात आला आहे. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्याने यावर आता तातडीने दखल घेण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कोयता गँग विरोधात कारवाई करा, अशी मागणी केली होती.
दुसऱ्या बाजूला मात्र अशी कुठलीही गॅंग हडपसर भागात सक्रिय असणार नाही, अशी ग्वाही हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली होती ज्या परिसरात कोयता गँगने दहशत पसरवली होती,
त्या हडपसर भागात पोलिसांकडून “रुट मार्च” काढण्यात आला. दहशत पसरवणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृतीला जरब बसावी, या हेतून पोलिसांनी रूट मार्चचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगमुळे अनेक जणांना त्रास होत होता.
या विरोधात मांजरी भागात स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता. कोयता गॅंग व्यापाऱ्यांना लुटत असून, यामुळे अनेक नागरिक भयभीत झाले आहेत हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथे कोयता गँगने दहशत पसरवली होती.
याबाबत स्थानिक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे तक्रार केली होती.