फोन टैपिंग: रश्मी शुक्ला यांच्या क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळले

मुंबई:(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – पुणे पोलिसांनी या संदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला. यामुळे आता शुक्ला यांच्या अडचणी वाढू शकतातपोलिसांचा क्लोजर फेटाळल्याने आता सरकारपुढील अडचणीही वाढू शकतात. रश्मी शुक्ला यांच्यावर आरोपही झाले होते. शुक्ला यांनी कुणाच्या म्हणण्यावरून हे फोन टॅपिंग केले? या संदर्भात ही आरोप झाले होते. जेव्हा हा क्लोजर रिपोर्ट फाईल करण्यात आला, आता तो न्यायालयाने फेटाळलेला आहे.
रश्मी शुक्ला यांनी काही महाविकाश आघाडीतील काही आमदारांचे, काही तत्कालीन मंत्र्यांचे फोन टॅपिंग केले होते. हा सगळा प्रकार पोलिसांमध्ये दाखल झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यानंतर तपास सुरू झाला. राजकीय नेत्यांचा फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणामध्ये यांना क्लीन चिट देण्यात आली होती.
परंतु तपासामध्ये मात्र काही आढळून आलं नाही, असे सांगण्यात आले. यानंतर या संपूर्ण प्रकारणामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टवर आज पुणे न्यायालयात युक्तिवाद झाला तेव्हा, न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे
प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. पुणे (Pune News) पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयाने आता फेटाळून लावले आहे.