कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं यांनी पुन्हा सीमावाद पेटवण्याचे विधान….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, जर सर्वांनी सहमती दर्शविली तर आम्ही सीमाप्रश्नावरील चर्चेवर सरकारला उत्तर देताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्याच्या भूमिका स्पष्ट करणारा ठराव मंजूर करू. त्यांच्या या प्रस्तावाला कर्नाटकच्या सभागृहातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा देखील दिला आहे.दरम्यान, नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात सीमा वादावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर त्यांनी सरकारला जाब देखील विचारला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन. राजकीय पक्षांनी जनतेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असं वर्तन करू नये,असे आवाहन देखील केले होते. मात्र, बोम्मईं यांच्या कर्नाटक विधिमंडळातील भूमिकेमुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. याचे पडसाद आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील दिसण्याची चिन्हे आहेत.महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून गेल्या दोन आठवड्यापूर्वी मोठे रणकंदन मजले होते. सीमावादावरून विरोधकांनी शिंदे यांनी फडणवीस सरकारला धारेवर धरले होते. या नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच न्यायालयात यात भूमिका घेईल असे मत मांडण्यात आले होते. या नंतर हा वाद शांत होत असतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईं यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री बोम्मईं यांनी महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार केला आहे. तसेच याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याचेही बोम्मईं यांनी म्हटले आहे. मंगळवारी विधानसभेत सीमावादावर झालेल्या चर्चेदरम्यान बोम्मईं यांनी स्वत: राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने जमीन न देण्याचा ठराव पास करण्याची सूचना केली होती. त्यानुसर लवकरच कर्नाटकच्या दोन्ही सभागृहात यावरुन ठराव पास होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद थांबला असल्याचे दिसताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं यांनी पुन्हा सीमावाद पेटवण्याचे विधान केले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही तसेच अधिवेशनात ठराव करण्याचा असल्याचा पुनरुच्चार बोम्मईं यांनी केला आहे.

Latest News