मुक्ता टिळक जी यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली…

नवी दिल्ली, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ‘पुण्याच्या महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. मुक्ता टिळक जी यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली. लोकोपयोगी मुद्दे उपस्थित करून त्यांनी आपला ठसा उमटवला. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमी संस्मरणीय राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या माजी महापौर आणि महाराष्ट्राच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.