शपथविधी सकाळच्या ऐवजी दुपारी झाला असता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते- BJP आमदार प्रवीण पोटे

अमरावती (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – अजितदादा वेळेचे प्रचंड पक्के आहेत. दादा विधानमंडळात अथवा मंत्रालयात सकाळी सातलाच येतात. अजित पवार यांच्याकडून आम्हाला वेळेच नियोजन करण्याबाबत शिकले पाहिजे.अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलताना आमदार पोटे यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने कर्तृत्वान स्त्रीयांचा सत्कार करण्यात येतो, त्याप्रमाणे जेव्हा पुरुषांचा सत्कार करण्याची सुरुवात होईल, त्यावेळी मी अजितदादा पवारांचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की तो शपथविधी सकाळच्या ऐवजी दुपारी झाला असता ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. त्यानंतर मात्र सावध होत हे मी गंमतीने म्हटले आहे. मनावर घेऊन नका. रागावू नका, अशी विनंतही पोटे यांनी अजित पवार यांना केली

विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या महिला एकत्र आल्या ते आमच्या अमरावती जिल्ह्यातील महिलांना प्रोत्साहीत करण्यासाठी आल्या असे मी समजेन. आमच्या पक्षातील नेते म्हणतात, तुझं तर सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यावर मी म्हटलं की काय त्यांच्याशी कबड्डी खेळू की भांडणं करू. माझ्या गावातील लोकांशी माझे चांगले संबंध राहिलेच पाहिजेत. त्या दृष्टीकोनातून मी अमरावती जिल्ह्यात काम करत असतो,

असेही पोटे यांनी सांगितलेआमदार पोटे म्हणाले की,

Latest News