राष्ट्रवादी ने आदेश दिला तर कसबा मतदारसंघातून निवडणूक लढविनार,:रुपाली ठोंबरे


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील कणखर आवाज असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतंच निधन झाल्यानं कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी रुपाली पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षा आहेत
दरम्यान, कसबा मतदारसंघात कामं झालेली नाहीत. सन २०१९ मध्ये मुक्ताताई आजारी आहेत म्हणून मनसेनं माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी आम्ही तडजोड केली पण नंतर या मतदारसंघात कुठलीही विकासाची कामं झाली नाहीत. इथल्या पोटनिवडणुकीत जनतेचा जो काही कौल असेल तो मी स्वीकारेल
-राष्ट्रवादी काँग्रेसने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. मुक्ताताईंच्या नंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणीही नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगा सुद्धा लहान असून त्याचं नुकतंच लग्न झालं आहे”